देवदैठणच्या विद्याधाम प्रशालेचे मैदानी स्पर्धेत यश

Image may contain: 22 people, including Prashant Walunj, people smiling, people sitting and people standingदेवदैठण, ता. ६ सप्टेंबर २०१८ (प्रा. संदिप घावटे) : श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झालेल्या  तालुकास्तर मैदानी स्पर्धेत देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. यातून १५ खेळाडूंची जिल्हास्तर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

१४ वर्षे वयोगट -
वेदीका धावडे -६०० मी. धावणे -प्रथम ,
महेश ढवळे -२०० मी . धावणे -प्रथम

१७ वर्षे वयोगट -
वैष्णवी वाघमारे -१०० मी . धावणे , तिहेरी उडी -द्वितीय क्रमांक , लांब उडी -तृतीय .
शुभांगी वाखारे -तिहेरी उडी -प्रथम , २०० मी . द्वितीय क्रमांक , मानसी गायकवाड -४०० मी . धावणे - प्रथम , पुनम गुंजाळ -८०० मी . धावणे -द्वितीय , गोळाफेक -तृतीय , सपना गायकवाड -३०००मी . चालणे -प्रथम , कोमल गायकवाड -३००० मी .चालणे -द्वितीय ,साक्षी ढवळे -भालाफेक -द्वितीय , अजिंक्य सरोदे -३००० मी धावणे -प्रथम ,

१९ वर्षे वयोगट -

प्रियंका साठे -८०० मी . धावणे -प्रथम , तिहेरी उडी -द्वितीय , रोशन साठे -१५०० मी. धावणे प्रथम , २०० मी धावणे - द्वितीय, प्रियंका साठे, पुजा गायकवाड, संध्या रसाळ, आश्विनी साठे यांनी रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला अशी माहिती मुख्याध्यापक संभाजी शेळके यांनी दिली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, प्रशांत वाळुंज, सतीश कौठाळे, सुनंदा शेळके , प्रमिला भांबिरे यांचे मार्गदर्शन लाभले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या