सणसवाडीत कंपनीत झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

No automatic alt text available.

सणसवाडी, ता.६ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : सणसवाडीत मशीनवर काम करताना झालेल्या दुर्घटनेत दोघा कामगारांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

सचिन ज्ञानेश्वर सावंत(रा.वढु बु.) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असुन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी सचिन हे सणसवाडी(ता.शिरुर) येथील पी.वाय.एन या अॅटो कंपनीत सुपरवायझर म्हणुन काम करत आहेत.या कंपनीत एकुण ७० कामगार करतात. गुरुवार (दि.६) रोजी या कंपनीत ६ वाजुन ४५ मिनिटांनी सुमारे २० हेल्पर व २५ अॉपरेटर पहिल्या शिफ्ट करिता कामास आलेले होते.

कंपनीतील काम चालु असताना सकाळी ८ वाजुन १० मिनिटांनी मशिनचा मोठा आवाज झाल्याने फिर्यादी सचिन हे तत्काळ घटनास्थळी पळत गेले.तेव्हा तेथे काम करणारे अॉपरेटर म्हणुन काम करणारे रुपेशकुमार ब्रिजकुमार सिंग(वय.२८ रा.एल.एन.टी फाटा मुळ रा.जलपुरवा, बिहार) व काळुराम किसन साळुंके (वय.४५ रा.तळेगाव ढमढेरे) हे दोघे जमीनीवर गंभीर जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसले.

रुपेशकुमार याच्या मानेवर जखम होउन रक्त येत होते तर काळुराम याच्या डोक्यास पाठीमागे मार लागलेला होता.या दोघांना तत्काळ इतर कामगारांनी उचलुन अॅम्ब्युलन्स मध्ये खासगी दवाखान्यात दाखल केले. या घटनेत दोघांना गंभीर मार लागल्याने मृत्यु झाला. याविषयी अधिक माहिती देताना शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी सांगितले कि,मशिनचा जॉब तुटुन वरील दोघांना जॉबचा मार बसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. शिरुर तालुक्यात या झालेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली असुन सणसवाडीत भितीचे वातावरन पसरले आहे. रांजणगाव, शिक्रापुर, सणसवाडीत बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर असुन कामगार वर्गाकडुन चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या