तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा तळेगावला संपन्न

Image may contain: one or more people, people playing sports, basketball court and outdoorतळेगाव ढमढेरे,ता.११ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जातेगाव बुद्रुकच्या संभाजी राजे विद्यालयाने मुलांच्या १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर धामारी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या १४  वर्षाखालील व १७ वर्षाखालील  संघाने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेवर वर्चस्व राखले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, माजी सरपंच महेंद्र पवार, सागर कोंडे, प्राचार्य माणिक सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- १४ वर्षाखालील मुले :- प्रथम - न्यू इंग्लिश स्कूल मलठण, द्वितीय - न्यू इंग्लिश स्कूल धामारी, तृतीय - रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे. १७ वर्षाखालील मुले :- प्रथम- संभाजी राजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, द्वितीय- रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल धामारी. १९ वर्षाखालील मुले :- प्रथम- संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, द्वितीय- भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ, तृतीय- रायकुमार बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे. १४ वर्षाखालील मुली :- प्रथम- न्यू इंग्लिश स्कूल धामारी, द्वितीय- विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल शिरूर. १७ वर्षाखालील मुली :- प्रथम- न्यू इंग्लिश स्कूल धामारी, द्वितीय- भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल शिरुर. १९ वर्षाखालील मुली :- प्रथम- भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ, द्वितीय- रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे, तृतीय- भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा.

विजेत्या संघांना जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या वतीने आकर्षक स्मृतिचिन्हे देण्यात आली. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा व्यवस्थापक रवींद्र भगत, नंदा सातपुते, गुलाबराव गवळे, नितीन माने, सुरेन्द्र दुबे, प्रियांका नांदखीले, हर्षदा परदेशी, हर्षाली भोईटे, चंद्रशेखर सातपुते यांनी परिश्रम घेतले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे समालोचन जयवंत कोकरे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या