वाघेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलकडून मंदिरांची स्वच्छता

मांडवगण फराटा, ता. ११ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा(ता. शिरुर) येथील श्री वाघेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातील मंदिर परिसरात स्वच्छता केली.

2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शंभरावी जयंती आहे. केंद्र सरकारच्या वतीने हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील श्री वाघेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छता फेरी काढली होती. यावेळी हमरा भारत स्वच्छ भारत, our city clean city अशा प्रकारच्या घोषणा विद्यार्थी देत होते. विद्यार्थ्यांनी येथील मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर व माऊली मंदिर येथील परिसरात स्वच्छता केली. विद्यार्थ्यांना लहान वयात स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी ही स्वच्छता फेरी काढण्यात आली होती.

यावेळी शिव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी, या इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक रोहिणी गवळी, विषया कोकरे, पल्लवी तावरे, श्रध्दा वाबळे, स्वाती फराटे, सोनाली तावरे, निलम कुसेकर, गिरीजा फराटे, अक्षय भिसे आदी शिक्षक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या