शिरुरला पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

Image may contain: one or more peopleशिरूर, ता.११ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर शहरातील कुंभारआळी येथे पतीकडुन पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली.

लता संदिपान  सोळुंके  (वय 32 राहणार कुंभार आळी शिरूर,  मूळ राहणार भेंड टाकळी तालुका गेवराई जिल्हा बीड) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.पतीने स्वतः पोलिस स्टेशन मधे येऊन खुनाची कबुली दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लता  सोळुंके हिचा  भाऊ पांडुरंग शामराव कदम (राहणार. मुंबई बाजार तालुका शिरूर) यांच्या फिर्यादीवरून मयत  लता हिला सांधेदुखीचा आजार असल्यामुळे गेली दोन वर्षापासून तिला चालण्यास त्रास होत होता. संधिवाताच्या आजारामुळे तसेच दाजी संदिपान याचे बाहेर कोठेतरी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन लता त्यांच्याशी रोज वादावादी घालत होती. अनेक वेळा ही वादावादी सोडवण्यासाठी फिर्यादी हे गेले होते व त्यांना वादावादी न करण्याचा सल्लाही दिला होता. तर (दि.९) रोजी रात्री लता व तिचे पती संदिपान यांच्यात भांडणे झाली होती. तसेच (दि.१०) रोजी पहाटे चार वाजता संदिपान यांना कामावर जायचे होते त्यासाठी आवराआवर  करण्यासाठी त्यांनी पत्नी लता यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती झोपेतून न उठल्याने  रागाच्या भरात पती संदिपान यांनी पत्नी लता हिचा जवळच असलेल्या ओढणीने गळा आवळून खुन केला आहे अशी कबुली संदीपान याने पोलिस व फिर्यादी यांना दिली.

याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संदिपान प्रभाकर सोळुंके( राहणार कुंभार आळी तालुका शिरूर जिल्हा पुणे,  मूळ राहणार भेंड टाकळी तालुका गेवराई जिल्हा बीड.) याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या