फराटे महाविद्यालयाची केरळ पूरग्रस्तासाठी मदत फेरी

Image may contain: 12 people, people smiling, people standing and outdoorमांडवगण फराटा,ता.१२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने केरळ राज्याच्या मदत व पुनर्वसन होण्यासाठी मदत गोळा करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली.

केरळ राज्यात झालेल्या अतिपावसामुळे आलेल्या महापुराणे अतोनात नुकसान झाले. त्या केरळ राज्याला मदत करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाणे आपली काहीतरी राष्ट्रीय आपुलकी व देशसेवा म्हणून सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मांडवगण फराटा गावात मदतफेरी काढली.सर्व राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वयंसेवक यांनी हातात मदत बॉक्स घेवुन तसेच घोषवाक्य तयार करून घोषणा देत मदत गोळा केली. या मदतीत गावातील सामाजिक कार्यकर्ते, दुकानदार, नेतेमंडळी, छोटे व्यावसायिक, पादचारी, हॉटेल व्यवसायिक, विद्यार्थी यांनी हातभार लावला व एकुण अकरा हज़ार रुपये जमा झाले.

यावेळी  जमा झालेली आर्थिक रक्कम कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे जमा करणार असल्याचे प्राचार्य डॉ. तुकाराम सावंत व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल पितळे यांनी सांगितले.ही केरळ पूरग्रस्तासाठीची मदतफेरी यशस्वी करण्यासाठी रासेयो सदस्य प्रा.जयराम पवार, प्रा.सुरेखा देशमुख, प्रा.सुप्रिया आटोळे ,प्रा. डाल्ली शर्मा व सर्व रासेयो स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या