बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा पोलीसांकडून उलगडा

मांडवगण फराटा, ता.१२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील भिमा नदी पाञात सापडलेल्या बेपत्ता मृतदेहाचा अखेर खुनाचा गुन्हा उघडकिस आणण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.१) रोजी सकाळी १० वाजणेच्या सुमारास मांडवगण फराटा येथील भिमानदी पाञात पुरुषाचे प्रेत आढळुन आले होते.याबाबत मांडवगणचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.सदर मयताचे पोस्ट मार्टेम केल्यानंतर मयताचा मृत्यु पाण्यात बुडुन झाल्याचे निष्पन्न झाले होते.

मांडवगण फराटा येथे नदीपाञात मिळुन आलेले प्रेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या बेपत्ता इसम बाळासाहेब सोनबा  मुरकुटे यांच्याशी मिळतेजुळते असल्याचे आढळुन आल्याने मयताच्या नातेवाईकांनी मयताच्या चिजवस्तु व फोटो पाहुन ते प्रेत बाळासाहेब याचेच असल्याचे ओळखले.

मयत बाळासाहेब याचे प्रेत मांडवगणला कसे आले याचा प्रश्न पोलीसांसमोर उपस्थित झाल्याने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने त्या दृष्टीने तपास सुरु केला.तपासादरम्यान मयत बाळासाहेब याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता योगेश दत्ताञय मुरकुटे व भाउसाहेब माळवदकर(दोघेही रा.मुरकुटेनगर,ता.हवेली) यांच्याशी मयताचा शिरसटवाडी येथील जमीनीवरुन दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाल्याची माहिती मिळाली.त्याअनुषंगाने योगेश व भाउसाहेब माळवदकर यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले कि,बाळासाहेब मुरकुटे याचे सोबत शेतीच्या कारणावरुन वाद होते.वारंवार विनंती करुनही केस मागे घेत नव्हता.(दि.२९/८) रोजी शिवाजीनगर कोर्टातील तारीख झाल्यानंतर वाद बसवुन मिटवु असा बहाणा करुन त्याचेकडील सेलेरियो गाडीत बसवुन लोणीकंद माथ्याजवळ व वडगाव बांडे या दोन ठिकाणी अतिदारु पाजुन त्यास हाताबुक्कयांनी मारुन वडगाव बांडे येथील भिमा नदी पाञात नदीच्या पुलावरुन ढकलुन देउन खुन करण्यात आल्याची कबुली दिली.

सदर गुन्हयात तपास  करताना मयताचा मृत्यु हा पाण्यात बुडुन झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यामुळे अकस्मात मृत्यु म्हणुनच गुन्हा दाखल झाला होता.परंतु गुन्हे शाखेने कौशल्यपुर्ण व सखोल तपास केल्यानेच खुनाचा गुन्हा उघडकिस आणण्यात यश आले आहे.

हा गुन्हा उघडकिस होण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे,सहायक फौजदार दिलीप जाधवर, मुकुंद आयाचित, चंदनशिव, धीरज जाधव, विजय कांचन यांनी कामगिरी केली. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या