विद्याधामच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकाला भेट

Image may contain: 17 people, including Rohit Thorat, people smiling, crowd and outdoorतळेगाव ढमढेरे,ता.१५ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे ढमढेरे वाडा व हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाला शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट दिली.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजित क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत ७०० वर्षापुर्वीचा शिलालेख, बुरूज, गढी, जुन्या काळातील विहीर यांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल असे इतिहास अभ्यासक संतोष परदेशी यांनी सांगितले. याप्रसंगी गौतम चिकणे, कृष्णकांत रुपनवर, राजश्री ढमढेरे ,सविता दुधाडे यांनी माहिती दिली.

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाला भेट दिल्यानंतर प्रा. कुंडलिक कदम यांनी हुतात्मा  पिंगळे व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर विठ्ठलराव ढमढेरे यांनी ढमढेरे वाड्याची माहिती सांगितली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या