ग्रामपंचायत निवडणुकीला तोडफोडीने गालबोट

Image may contain: 2 people, people standing, car, sky, outdoor and natureशिरुर, ता.१६ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) :   करडे ग्रामपंचायत निवडणूकीच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी  उमेदवारी अर्ज माघार न घेतल्याचा रागातुन प्रतिस्पर्धी उमेदवारीच्या गाडीच्या काचा फोडल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडला.

यासंदर्भात विशाल निळकंठ घायतडक (रा.करडे)यांनी फिर्याद दिली आहे.तर गणेश रोडे,महेश रोडे,किशोर सांगळे,विजयकुमार जगदाळे ,सुरेश रोडे (सर्व रा.करडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.२६) रोजी  करडे (ता.शिरुर) येथिल ग्रामपंचायतीकरिता मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज(दि.१५) रोजी शेवटचा दिवस होता.घायतडक यांनी इतर मागास वर्गातुन ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे माघार व चिन्ह वाटप होते.विशाल घायतडक हे दुपारी तहसिल कार्यालयातील तिसरा मजल्यावर आले, त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश दत्तात्रेय रोडे हे आले त्यांच्या  बरोबर तीन ते चार लोक होते.

त्यावेळी प्रतिस्पर्धी गणेश रोडे म्हणाले की उमेदवारी अर्ज मागे घ्या त्यावर घायतडक म्हणाले की मी उमेदवारी  अर्ज मागे घेणार नाही असे सांगितल्यावर रोडे यांना त्यांच्या राग येवून त्यांनी शिविगाळ करत दम दिला. रोडे यांचा  भाउ महेश दत्तात्रेय रोडे,किशोर सांगडे,विजयकुमार जगदाळे हे लोक तेथे होते. यापैकी कोणतीतरी एकाने तहसील कार्यालयाच समोर पुणे नगर रोडवर उभी असणारी एनडेव्हर कार नंबर (एम.एच.१२ एन.टी.२)या गाडीची पुढची व मागची काच फोडून नूकसान केले व ड्रायव्हरला  चापट मारली व धक्काबुकी केली असल्याचे घायतडक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील हे करत आहेत.

हाकेच्या अंतरावर घटना ;नागरिकांत चर्चा

शिरुर तालुक्यात होत  असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या अतिसंवेदनशील म्हणुन ओळखल्या जात आहेत.या वेळी सकाळपासुन इच्छुकांबरोबरच समर्थकांची शिरुर तहसिलला झुंबड उडाली होती.या घटनेची सुरुवात तिस-या मजल्यावरुन झाली.तर घटना पोलीस स्टेशनच्या हाकेच्याच अंतरावर घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले.यावेळी काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या