रांजणगाव पोलीसांचा दबंग कारवाईचा धडाका सुरुच

Image may contain: 1 person, motorcycleरांजणगाव गणपती, ता.१६ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव एमआयडीसी पोलीसांचा दबंग कारवाईचा धडाका सुरुच ठेवला असुन गेल्या तीस दिवसात चोरीच्या दुचाकी  ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगावला पोलीस निरीक्षक म्हणुन मनोजकुमार यादव यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी चोरीच्या वाहनांचे तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार रांजणगाव पोलीसांनी विविध ठिकाणी तांञिक माहिती गोळा करुन आरोपींचा शोध घेत अॉगस्ट महिन्यात २२ चोरीच्या दुचाकींचा तपास करुन आरोपींना अटक केली होती.त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातील दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.या कारवाईचा धडाका कायम ठेवत कसोशीने तपास एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी सापळा रचुन,चोरटयांच्या बारीक हालचाली व चोरीच्या पद्धतींवर माहिती घेत तपास सुरु ठेवला होता.तपासादरम्यान बाबु मोरे हा मोटारसायकल चोरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार पोलीसांनी सापळा रचुन आरोपी बाबु मोरे याला ताब्यात घेतले.पोलीस स्टेशनला अधिक माहितीसाठी आणले असता,सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलीसी खाक्या दाखवताच त्याने साथिदारांची नावे सांगितली. त्यानुसार बाबु मोरे(रा.शिरुर), अतिश काळाने, विठ्ठल लाडाने (दोघेही रा. बेलवंडी), गणेश वाखारे(हिंगणी), अक्षय रणदिवे (माठ, ता. श्रीगोंदा), अक्षय वेताळ (रा. न्हावरा), गणेश वाघमारे (रा.शिरुर) या  आरोपींना पकडुन ताब्यात घेतले. व या आरोपींनी चोरलेल्या सुमारे ११ दुचाकी हस्तगत केल्या.

अशा प्रकारे रांजणगाव पोलीसांनी विविध ठिकाणांहुन ३० दिवसांच्या कारवाईत सुमारे ३५ चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत.रांजणगाव पोलीस स्टेशनचे १० तर वेगवेगळया पोलीस स्टेशनचे चोरीचे एकुण १२ गुन्हे उघडकिस आणले असुन १२ लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, होमगार्ड किरण दाते, दिपक दंडवते यांच्या तपासपथकाने महत्वाची भुमिका बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या