शिरसगावकरांचा शिरुर तालुक्यात नवा आदर्श

Image may contain: 13 people, people smiling, people standing and outdoorशिरसगाव काटा, ता.१८ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथे ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्यातुन एक गाव-एक गणपती उपक्रम राबविण्यात आला असुन गावाने शिरुर तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.

गावात वाद-विवाद होउ नये व एकोपा राहावा यासाठी एक गाव-एक गणपतीची संकल्पना काही ग्रामस्थांनी मांडली त्यानुसार गावातील सर्व युवक,ज्येष्ठ, नेतेमंडळी यांची गणपती स्थापना करण्यापुर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकित सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळुन संपुर्ण गावात केवळ एकच गणपती स्थापन्याबाबत सर्वांचे एकमत झाले.यास गावातील सर्व मंडळाच्या प्रमुखांनी व युवकांनी होकार दिला.त्यानुसार शिरसगाव काटा येथे अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी  व अनेक गावांनी चौका-चौकात गणपती स्थापना केली असुन शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील  ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने अनावश्यक खर्च टाळुन गावात केवळ एकच गणपती स्थापन केल्याने शिरुर तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.शिरसगाव काटाचे सरपंच सतीश चव्हाण, घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासो कोळपे,भरत चव्हाण,सोसायटीचे चेअरमन अण्णासो कदम,तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय जगताप,मानसिंग कदम, नंदु कदम, उपसरपंच प्रकाश जाधव, संजय शिंदे, गणीभाई शेख, एम.एस.कदम, माजी सरपंच रामचंद्र केदारी, ग्रा.स शिवाजी सोनटक्के, भाउसाहेब गायकवाड आदी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील सर्व तरुणांच्या सहकार्यातुन हा उपक्रम राबविण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या