शिक्रापूर एसटी स्टॅन्ड आवारात बदल करणार: रावते

Image may contain: 9 people, people standingशिक्रापूर, ता.१८ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) :  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवार (दि.१७) रोजी शिक्रापूर येथील एसटी स्टॅन्डला भेट देऊन आवाराची पाहणी केली. 

एसटी स्टॅन्ड परिसरात नावीन्यपूर्ण बदल करण्याचे आदेश एसटी महामंडळाला देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उर्वरित  जागेत व्यापार संकुल किंवा  सरकारी स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवता येतील का यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने ना. रावते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे, ग्रा. प. सदस्य भगवान वाबळे, दत्तात्रय  राऊत, दत्तात्रय भुजबळ, उत्तम गायकवाड, डॉ.राजेंद्र ढमढेरे, महेश खैरे, रोहीत खैरे, विजय लोखंडे, संतोष काळे, रविराज नलावडे, कानिफ सासवडे, सुनिल चौरसिया आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या