पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मालिकेला लागला 'ब्रेक'

शिरूर, ता. 19 सप्टेंबर 2018: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज (मंगळवार) कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, असेही म्हणता येणार नाही. कारण, सप्टेंबर महिन्यापासून इंधन दरवाढीची मालिका सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने किमान आज तरी विश्रांती घेतली आहे, असेच म्हणावे लागेल.

मुंबईत पेट्रोलचे दर आज 89.54 रुपये आहेत तर डिझेल 78.42 रुपयांना विकलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या 18 दिवसात पेट्रोलचे दर जवळपास पावणे चार रुपयांनी वाढले आहेत. राज्यातील 12 जिल्हे वगळल्यास बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये

पेट्रोलच्या दरांनी
केली नव्वदी पार
मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या जवळपास आहे. उर्वरीत 24 जिल्ह्यात दरांनी नव्वदी गाठली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.54 रुपये झाला आहे.

परभणीत सर्वात महाग पेट्रोल
देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. परभणीत पेट्रोलचे दर 91.29 रुपये प्रतिलीटर आहे. तर देशात सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे विकलं जात आहे. येथे एक लिटर पेट्रोल केवळ 70.70 रुपयात मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या