गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार: गायकवाड (Video)

करडे, ता.१९ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : सर्वांना सोबत घेउन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे करडे (ता.शिरुर) येथील सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

शिरुर तालुक्यात सर्वांचे लक्ष लागुन असलेल्या करडे(ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत निवडणुकिचे थेट सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड यांच्याशी बातचीत करण्यात आली.यावेळी संकेतस्थळाशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले शिरुर तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या करडे ग्रामपंचायतची हि निवडणुक होत असुन मी माजी उपसभापती राजेंद्र जासुद,विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,माजी उपसरपंच गणेशदादा रोडे,माजी सरपंच बाळासाहेब बांदल,ज्येष्ठ व युवकांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातुन निवडणुक लढवत आहे.करडे गावचा सर्वांगिन विकास हे एकमेव ध्येय असुन गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेउन भविष्यकाळात काम करणार आहे.शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविणार असुन पारदर्शी कामावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

करडे गावचे सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड यांचा गेल्या अनेक वर्षांपासुन सामजिक कार्यात सातत्याने सहभाग असुन युवकांमध्ये सुस्वभावाने ते परिचित आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या