शिरुरला महिलांची गैरसोय होणार आता दुर

शिरुर, ता. २० सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात जागतिक दर्जाची स्वच्छतागृहाची उभारणी केली असुन पुरुषांसह महिला व अपंगांची स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय आता दुर होणार आहे.

शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्ययार्ड शिरूर येथे दररोज शेतकरी बाजार तसेच भुसार शेतमालाचे जाहीर लिलावाने व्यवहार होत असतात. तेथे अंदाजे 2000-3000 शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, हमाल व इतर बाजार घटक यांची ये-जा सुरू असते. त्यांचे दैनदिन गरजा भागविण्यासाठी बाजार समितीने उभारलेले शौचालय व मुताऱ्यांची संख्या अपुरी पडत होती, त्यामुळे बाजार समितीने महिला व पुरूषांसाठी सुलभ शौचालयाची उभारणी करण्याचे ठरविले होते.

त्यास अनुसरून बाजार समितीने आवारात सुलभ शौचालय पे ॲण्ड युज या तत्वावर जनजागृत्ती सामाजीक संस्था, मुंबई यांचे मार्फत उभारले आहे. सदरचे सुलभ शौचालय अत्यंत उत्कृष्ट व उच्च दर्जाचे मटेरिअल वापरून उभारलेले आहे. त्यामध्ये महिला, पुरूष, अपंगांसाठी वेगवेगळी सोय करणेत आलेली आहे. या स्वच्छता गृहामध्ये संडास, मुताऱ्या याबरोबर आंघोळीसाठी बाथरूमचीही सोय करणेत आलेली आहे. पुणे जिल्हा व परिसरात शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाचे स्वच्छतागृह उभारणारी शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिती ही एकमेव संस्था ठरली असल्याचे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.

शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीने उभारलेले स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी बाजार समितीला कोणत्याही प्रकारचा खर्च होणार नसुन हा सर्व खर्च जनजागृत्ती सामाजीक संस्थेमार्फत नियमीत होणार आहे. बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येकाला नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध झालेली असल्यामुळे  नागरिकांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या