पाबळला सुरु होणार आयटीआयचा अभ्यासक्रम (Video)

पाबळ, ता.२० सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : पाबळ (ता. शिरुर) येथे लवकरच आयटीआयचा अभ्यासक्रम सुरु करणार असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भगवान दगडू घोडेकर यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतुने पाबळ(ता.शिरुर) येथील भैरवनाथ विद्यालयात नवीन ६ खोल्यांचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.पाबळ गावाला लागुन असलेल्या औद्योगिकिरणामुळे गावच्या व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना आयटीआयचा अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर ख-या अर्थाने फायदा होणार असुन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुर जावे लागणार नाही.

पाबळ गावच्या भैरवनाथ विद्यालयाच्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर गावाने बिनविरोध निवड केल्याबद्दल प्रारंभी आभार व्यक्त केले.या वेळी त्यांनी बोलताना सांगितले कि,शिक्षणाची पुर्वी पासुनच तळमळ होती त्यामुळे सर्वानुमते  माझी संस्थेवर अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.गावच्या विदयार्थ्यांना चांगल्या दर्जाचे आयटीआय शिक्षण मिळावे या हेतुने सातत्याने पाठपुरावा करुन आयटीआयसाठी मंजुरी आणली.गावच्या अनेकांनी यासाठी मोठी मदत केली.सहा कोर्सेस सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही बसवले असुन या माध्यमातुन निगराणी केली जात आहे.शाळेला संरक्षक भिंतीचे काम पुर्ण करण्यात आले असुन त्यामुळे शाळेच्या सुरक्षितेत अधिकच भर पडली आहे.फिल्टरची सर्वोत्तम व्यवस्था केलेली आहे.

वि्दयालयातील विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम बसवण्यात आली आहे.वि्दयालयात प्रशस्त पार्किंग केल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.स्थानिक कंपन्यांनी विदयालयाच्या विकासात हातभार लावण्याचे काम केले आहे.झाडे, शिष्यवृत्ती देउन अनेकांचे सहकार्य लाभत आहे. भविष्यात फार्मसी सुरु करण्यासाठी प्रयत्न करत असुन सर्व संस्थाचालक पाठपुरावा करत आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या