देवदैठणच्या तीन खेळाडूंची मैदानी स्पर्धेसाठी निवड

Image may contain: 7 people, people standingदेवदैठण, ता.२१ सप्टेंबर २०१८(प्रा.संदीप घावटे) : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील तीन खेळाडूंची पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच वाडीया पार्क अहमदनगर येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या.यामध्ये १७ वर्ष वयोगटात तिहेरी उडीत  वैष्णवी मल्हारी वाघमारे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर शुभांगी भाऊसाहेब वाखारे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोघी नववीच्या वर्गात शिकत आहेत.१९ वर्ष वयोगटात तिहेरी उडीत प्रियंका राजू साठे हिने प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धतील खेळाडूंच्या कामगिरीमुळे त्यांची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक संभाजी शेळके यांनी दिली.
    
यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, सतीश झांबरे, प्रशांत वाळुंज, सतीश कौठाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे मुख्याध्यापक संभाजी शेळके, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु .म.परदेशी, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, महाराष्ट्र अॅथलेटीक्स असोसिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव, क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, नगर तालुका प्रमुख महेंद्र हिंगे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या