मांडवगण फराटा येथे १११ जणांचे रक्तदान

Image may contain: 7 people, people smiling, people standingमांडवगण फराटा, ता.२१ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोकनेते श्री दादापाटील फराटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फराटे पाटील डीप्लोमा फार्मसी महाविद्यालय तसेच अहमदनगर ब्लड बँक यांच्या सयुंक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.

या शिबिरात निःशुल्क रक्टगट तपासणी करण्यात आली .यात 111 जणांनी रक्तदान करून 550 विद्यार्थ्यांनी रक्टगट तपासणी करून घेतली.या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. तुकाराम सावंत, प्राचार्य डॉ. मृणाल शिरसाट, प्राचार्य विवेक सातपुते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा . अमोल पितळे, प्रा.जयराम पवार, अहमदनगर ब्लड बँकचे डॉ.पवार यांनी दिपज्योत प्रज्वलित करून सरस्वती पुजन केले.
      
यावेळी शिबिरात राजीव फराटे पाटील म्हणाले की, दरवर्षी विविध प्रकारच्या रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र त्यामानाने रक्तदाते कमी आहेत हे लक्षात घेवुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाणे रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. भविष्यात पण अशाप्रकारचे सामाजिक कार्य आमच्या संस्थेतर्फे केले जातील.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.अमोल पितळे,प्रा.जयराम पवार, प्रा. सुरेखा देशमुख, प्रा. सुप्रिया आटोळे, प्रा.अविनाश ढोबळे, प्रा.प्रीती ओल्लला, प्रा. सागर खर्डे, प्रा. अनिता नजन, विक्रम ढवळे, नवनाथ निकत,सागर कुदळे, आबा जाधव, विपुल खांडरे यांनी परिश्रम घेतले. या शिबिराच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विशाल कोपनर यांनी तर आभार प्रा. जिवन राजगुरु यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या