आकांक्षाच्या विशेष मुलांनी लुटला सुग्रास भोजनाचा आनंद

Image may contain: 17 people, people standing and indoorशिरुर,ता.२२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी विशेष मुलांसोबत खेळण्याचा आनंद लुटला.तर शिरुर पंचायत समितीच्या पदाधिका-यांनी विशेष मुलांना पंचायत समितीत विशेष भोजनाला निमंञित केले होते.
शिरुर शहरात आकांक्षा एज्युकेशनल  फौंडेशन हि विशेष मतिमंद मुलांची संस्था आहे. या संस्थेत सुमारे वीस २० विशेष मुला-मुलींना शिक्षण दिले जाते.शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,पोलीस कॉंस्टेबल संतोष औटी,महिला दक्षता  समितीच्या अध्यक्षा शोभना पाचंगे आदींनी संस्थेस भेट देउन विशेष मुलांची आस्थेने विचारपुस केली.यावेळी पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी विशेष मुलांसोबत संगीत खुर्चीचा आनंद लुटला.यावेळी बोलताना घोडके म्हणाले कि,विशेष मुलांचे संगोपनाचे अवघड कार्य सामाजिक भावनेतुन पार पाडले जात असुन संस्थेस भविष्यकाळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.प्रारंभी संस्थेच्या संस्थापिका राणी चोरे यांनी संस्थेविषयी व भविष्यकालीन उपक्रमाविषयी माहिती दिली.
Image may contain: 9 people, people standing

शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्या सह पंचायत समितीच्या पदाधिका-यांनी आकांक्षा संस्थेतील विशेष मुलांना शिरुर पंचायत समितीत मिष्ठान्न भोजनासाठी नुकतेच आमंञित केले होते. यावेळी संस्थेचे कार्य जाणुन घेतल्यानंतर सर्वजन भारावुन गेले.शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी संस्थेस पाणी शुद्धिकरण यंञणा भेट म्हणुन दिली.

यावेळी संस्थेतील अक्षय उचाळे, ज्योती सदाफुले, ठोंबरे या कर्मचा-यांसह विशेष मुले उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या