खासदार आढळराव पाटलांचा झंझावाती गावभेट दौरा (Video)

पाबळ, ता.२२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा (दि. २१) रोजी मतदार संघात झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला होता.

पाबळ येथे  गणेशनगर-पाबळ रस्ता तयार करणे (रु.४० लाख), पाबळ-नऱ्हेबेंदवस्ती रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपुजन- रु. १० लक्ष, पाबळ-भोरशेत सभागृह (८ लक्ष), पाबळ येथे भैरवनाथ वारकरी सांप्रदाय भवन उद्घाटन-रु. ९ लक्ष, माळवाडी वाचनालय, सोनबनवस्ती वाचनालय, थोरस्थळ वाचनालय-रु. ९ लक्ष तसेच जि. प. शाळा वर्गखोल्या भूमिपुजन-रु. ५ लक्ष, जातेगाव खुर्द ते पऱ्हाडवाडी शिवरस्ता-रु. १० लक्ष, तसेच करंदी येथे मारुती मंदिर सभामंडप-रु. २५ लाख, सौर ऊर्जा आधारित पवनचक्की उभारणे-रु. २३.३५ लक्ष,करंदी दशक्रिया विधी शेड उभारणे-रु. ५ लक्ष, करंदी अंगणवाडी इमारत बांधणे-रु. ६ लक्ष, करंदी चौक हायमस्ट दिवे बसविणे-रु. २ लक्ष,करंदी सांस्कृतिक भवन-रु. ३ लक्ष, विद्या विकास मंदिर वर्गखोल्या-रु. ५ लक्ष, करंदी चौकात ओटे बांधणे -रु. २ लक्ष, अभिनव विद्यालय सरदवाडी वर्गखोली-रु. ५ लाख या कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ गावभेट दौरा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. तर जातेगाव खुर्द येथे विकासकामांचा उद्घाटन समारंभ व विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गावातील ज्येष्ठांचा सन्मान खासदारांच्या हस्ते करण्यात आला.
 

पाबळ (ता.शिरुर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व गावभेट दौ-यानिमित्त बोलताना ते म्हणाले कि, माझ्यावर सातत्याने टिका केली जातेय. परंतु माझे नाव घेउन कोणाची हि टिका करायची हिंमत होत नाही.विमानतळ दुसरीकडे गेलं म्हणुन माझ्यावर खापर फोडलं जातं परंतु विमानतळ तुमच्याकाळात होउ शकलं नाही ते अपयश तुमचं आहे.या भागातुन जाणारी रेल्वे मी मंजुर केलीय.मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर केला.काम करणा-यावर खोटे नाटे आरोप केले जात आहे. आतापर्यंत कोणता खासदार प्रत्येक गावा-गावांत पोहोचला होता असे म्हणत तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब द्या असे म्हणत विरोधकांवर जोरदार तोफ डागली.


नियोजन समिती चे सदस्य अरुण गिरे बोलताना म्हणाले कि, आंबेगाव शिरुर राजकारणाची सातत्याने चर्चा होत  असुन जनतेने ज्यांना निवडुन दिलयं त्याच्याकडुन काय मिळालयं याचा विचार करावा असे ते म्हणाले. शिवसेनेच्या जयश्री पलांडे यावेळी म्हणाल्या कि, राजकारणात गेमा होत असतात,त्यात मी बळी ठरत गेले. पाबळचा खरा विकास भाजप-शिवसेनेने केला असुन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वाधिक निधी पाबळसाठी दिला आहे.यावेळी शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख सोपान जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखिले, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, पाबळच्या सरपंच रोहिणी जाधव, युवासेनेचे तालुकाप्रमुख माउली घोडे, आंबेगाव तालुका प्रमुख सोपान जाधव, जातेगाव चे सरपंच समाधान डोके,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, उपतालुकाप्रमुख नितीन दरेकर, समाधान डोके आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या