रांजणगावच्या विकासाचा डंका वाजवला जातोय: संदीप कुटे

Image may contain: 2 people, people sitting
रांजणगाव गणपती, ता. 22 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): रांजणगाव मध्ये पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापण तसेच कचऱयाच्या अनेक समस्या "जैसे थे"च असून सत्ताधारी फक्त विकासकामे केल्याचा 'डंका'वाजवत आहेत, असे मत ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे यांनी  www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केले.

संपुर्ण शिरुर तालुक्याचं लक्ष असलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी गावात प्रचाराची राळ उठवली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सत्ताधारी मंडळी गावात अनेक 'कोटींची' विकासकामे केली असल्याचे जाहीर भाषणात सांगत असून, विरोधक मात्र 'विकास' हरवल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सत्ताधार्यांपुढे विरोधकांनी मोठे आव्हान निर्माण केल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

रांजणगाव मध्ये पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापण,तसेच कचऱ्याच्या अनेक समस्या "जैसे थे"च असुन सत्ताधारी मंडळी फक्त विकासकामे केल्याचा "डंका"वाजवत आहेत. असे मत ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे यांनी 
www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केले. कुटे म्हणाले, विरोधकांनी कोंढापुरी येथील तलावातून गावच्या पिण्यासाठी जे पाणी आणलंय ते कुठं मुरतय? हे जाहीरपणे सांगावे. इथं लोकांना प्यायला पाणी नाही अन् सत्ताधार्यांनी त्या पाण्यावर फळांच्या बागा फुलविल्या आहेत. गावठाण मध्ये असलेला पाझर तलाव काही वर्षांपुर्वी पुर्ण क्षमतेने भरल्यास संपुर्ण गावाला वर्षभर पाणी पुरायचे. परंतु सत्ताधार्यांनी ह्या तलावात भराव टाकुन काही प्रमाणात तो बुजवून त्यावर अतिक्रमन केले आहे.

गावातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सरळ ओढ्यात सोडले जात असून, त्यामुळे जनावरांचे आणि ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे ओढ्याच्या कडेला असणाऱ्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणी दुषित झाले आहे. ग्रामस्थांना शेती करता येत नाही तसेच गावात मोठया प्रमाणात कचरा होत असून त्याचे व्यवस्थापण व विल्हेवाट लावण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. सत्ताधार्यांनी १० वर्षात काय विकासकामे केली हे जाहीर व्यासपीठावर सांगावं मी कधीही त्यांच्याशी सामोरासमोर बोलण्यास तयार आहे, असेही संदीप कुटे म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या