गावच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात: महेशकाका बेंद्रे

Image may contain: 1 person, smiling, sitting, plant, tree, outdoor and natureआंबळे, ता. २२ सप्टेंबर २०१ ८(प्रतिनीधी) : गावचा सर्वांगिण विकासासाठी निवडणुकित उभा राहिलो असल्याचे आंबळेचे सरपंचदाचे उमेदवार व शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेशकाका बेंद्रे यांनी सांगितले.

एमएस्सी अॅग्री असे उच्चशिक्षित असलेले महेशकाका बेंद्रे हे शिरुर हवेलीचे आमदार पाचर्णे यांच्याकडे स्वीय सहायक म्हणुन काम करत आहे. गावातील सर्व कार्यकर्त्यांना घेउन ते भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातुन सरपंचपदासाठी निवडणुक लढवित आहे.

महेशकाका यांनी बोलताना सांगितले कि, आमदारांकडे काम करत असताना आंबळे गावात सुमारे २० कोटी रुपयांची विकासकामे मंजुर करुन घेतली  आहेत.त्यामध्ये अंगणवाडी, वाचनालय, सामाजिक सभागृह, रस्ते, स्मशानभुमी, पाणी पुरवठायोजना, ट्रान्सफॉर्मर, पाणी शुद्धिकरण यंञणा, आरोग्य केंद्र, सौरदिवे आदी सुमारे २० कोटींच्या कामांचा समावेश आहे. त्याचबरोबर २५० जुनी व १५० नवीन अशा जवळपास ४०० संजय गांधी योजनांची पेंशन प्रकरणे मंजुर केली आहेत.४५ जुनी व १६५ नवीन घरकुले मंजुर होणार आहे तर ३५५ महिलांना मोफत उज्वला गॅस, सिंचन विहिरी, शेततळी अशा अनेक  योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवुन दिला आहे. त्याचबरोबर गावातील कोणालाही कसलीही अडचण आली तरी तत्काळ मदत केली आहे.

तसेच भविष्यात गावातील ड्रेनेजलाइन, क्रॉंकिटीकरन, शासकिय योजना,वाड्या-वस्त्यांवरील रस्ते व चांगली लाइट व्यवस्था, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, सुसज्ज बस स्टॅंड, सीसीटिव्ही, वयोवृद्ध व निराधार, अपंग शासनाची पेंशन आदी योजना राबविण्यार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भैरवनाथ पॅनेल मध्ये अश्विनी संतोष बेंद्रे, शितल अशोक जाधव, मारुती शंकर झेंडे हे वॉर्ड क्र १ मधुन, वॉर्ड क्र.२ मधुन शरद अशोक निंबाळकर, रंजना अनिल बेंद्रे, प्रज्ञा श्रीकृष्ण सिन्नरकर व राहुल सुखदेव धुमाळ, माया बाळासाहेब बेंद्रे, मयुर प्रमोद बेंद्रे हे वॉर्ड क्र.३ मधुन निवडणूक लढवत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या