अशोक पवारांकडून पाप झाकण्यासाठी शेतक-यांची दिशाभूल

Image may contain: 4 people, people sitting and indoorशिरुर, ता. २३ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्पाचा विज खरेदी करार तुमच्या सरकारच्या काळात का केला नाही ? त्या मुळे कारखान्याच्या झालेल्या नुकसानीस कारखान्याचे चेअरमन अशोक पवार हे जबाबदार  असुन त्यांनी सहवीजनिर्मिती प्रकल्पा संदर्भात शेतक-यांची दिशाभुल केली असुन त्यांनी  राजीनामा दयावा अशी मागणी शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पञकार परिषदेत केली.

याबाबत  माहिती देताना पाचर्णे म्हणाले कि, घोडगंगा  कारखान्याची सर्वसाधारण सभा (दि.२५) रोजी असुन संचालकांना व सभासदांना अजेंठा व अहवाल मिळणे अपेक्षित असताना (दि.२१) पर्यंत अनेकांना सभेचा अजेंठा व अहवाल मिळाला नाही.कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला असुन वीज खरेदी करारास नुकतीच या सरकारने मंजुरी दिली.माञ सध्याचे कारखान्याचे चेअरमन अशोक पवार हे वारंवार सरकार विरोधी अपप्रचार करत आहेत व आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्प उभारणीनंतर कारखान्याच्या चेअरमनच्या निष्क्रियतेमुळे कारखान्यावर व्याजाच्या रुपाने कोट्यावधीचा भुर्दंड पडला.त्यामुळे सभासदांचे व उस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,(२९.१२.२००९) रोजी सर्वसाधारण सभेत सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या ठरावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. त्यानंतर साखर आयुक्तांनी (दि.११.२.२०११) रोजी प्रशासकिय मान्यता दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सहकारी विकास निगम व केंद्र सरकार यांच्याकडे प्रकल्प अहवालानुसार कर्ज मागणी केल्यानंतर तीन बैठकांनंतर कर्ज मंजुरी मिळाली. (दि.२२.१.२०१३) रोजी याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. जॉइन्ट डायरेक्टर सहवीज प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली (दि.११.२.२०१३ व २६.२.२०१३) रोजी प्री.बीड,टेक्नीकल बीड) मिटिंग झाली.व सहकार मंञी यांच्या अध्यक्षतेखाली (दि.६.५.२०१३) रोजी बॉयलर व टर्बाईन साठी मिटिंग झाली.या मिटिंग मध्ये सर्व निर्णय पुर्ण करण्यात आले.दरम्यान राज्यातील भिमा शंकर,पराग शुगर,कर्मयोगी साखर कारखाना इंदापुर,श्री दत्त लिमिटेड (कोल्हापुर), सासवड माळी शुगर (सोलापुर),निराभिमा इंदापुर,मातोश्री लक्ष्मी शुगर(अक्कलकोट), भैरवनाथ शुगर (सोलापुर), संत तुकाराम या साखर कारखान्यांचे वीज खरेदी करार झाले. हे सर्व करार विधानसभा निवडणुक (२०१४) पर्यंत झाले होते.माञ घोडगंगा कारखान्याचा झालेला नव्हता.तो वीज खरेदी करार(२६.०७.२०१८) रोजी करण्यात आला. राज्यातील इतर कारखान्यांनी वीज खरेदी करार केले ते सन २०१४ पर्यंत. त्या काळात राष्ट्रवादीचे सरकार होते, आमदार अशोक पवार होते तर अजित पवार उपमुख्यमंञी होते.मग का करार केला नाही असा सवाल पाचर्णे यांनी करत सभासद शेतक-यांशी फार मोठे पाप त्यांनी केले असुन पाप झाकण्यासाठी शेतक-यांची दिशाभुल केली जात आहे.

घोडगंगा कारखान्याचे चेअरमन, एम.डी.संचालक मंडळांना वेळोवेळी वीज वितरण कंपनी कडुन ग्रीड उभारणे व पॉवर यार्डचे तपासणी अहवाल मागणीसाठी नोटिस देवुनही त्याची कारखान्याकडुन पुर्तता झाली नाही. म्हणजे जाणीवपुर्वक हा करार केला नाही.तो का केला नाही याचा जाब आम्ही सर्वसाधारन सभेत विचारणार आहे.कोट्यावधी रुपयांचा तोटा व कर्ज हा कारखान्यावर बोजा पडला असुन त्यांचा राजीनामा मागणार आहोत.सर्वसाधारण सभा गोंधळ करुन संपविली तरी आम्ही पुढील काळात त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांच्यामुळे हा करार झाला असे ते सांगतात परंतु या सरकारमध्ये मुख्यमंञी, सहकारमंञी, उर्जामंञी यांनी समिती गठित करुन धोरणात्मक निर्णय घेतला.शेतक-यांचे हित लक्षात सरकारने हा निर्णय घेतला परंतु या सरकारचे उपकार मानायचे तर सोडाच परंतु ज्यांनी हा करार केला त्यांचे फोटो अहवालावर टाकता आले नाही. अशा  निच वृत्तीचे राजकारण हे केले जात असुन याचा जाब विचारणार आहोत  असे पाचर्णे म्हणाले. आम्ही एफआरपीसाठी आवाज उठवल्यानंतर शेतक-यांच्या खात्यात एफआरपी जमा करण्यात आली. त्यामुळे सर्वसाधारण सभेत सरकारची बाजु मांडु असेही पाचर्णे यांनी सांगितले.

माळेगाव,सोमेश्वर,श्रीगोंदा या कारखान्यांच्या सर्वसाधारन सभा या वैचारिक बैठकांवर चालतात. सभासदांच्या प्रश्नांवर सभा सहा-सात चाललीत तर ती चालुन द्यावी तशी तयारी कारखान्याने करावी.काकासाहेब खळदकर यांनी कारखान्यास ७६ कोटींचा तोटा झाला असल्याचे सांगितले तर अॅड. सुरेश पलांडे यांनी सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरु झाला असला तरी वारंवार बिघाड होत  असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी खरेदी विक्रीचे संचालक आबासाहेब सोनवणे, धर्मेंद्र खांडरे,नामदेव घावटे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या