शिरुर पोलीसांकडून छाप्यात देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

टाकळी हाजी, ता.२३ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी डोंगरगण (ता.शिरुर) येथे टाकलेल्या छाप्यात देशी-विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर टाकळीहाजी नजीक डोंगरगण गावात स्वत:च्या घराच्या मागच्या शेडमध्ये एक इसम हा दारुचा साठा जवळ बाळगुन त्याची विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली.त्यानुसार सापळा रचुन छापा टाकला असता,किराणा दुकाना मालाच्या पाठीमागील गोडावुन व संडासचे असणा-या जागेत सुरेश चोरे हा दिसला.यावेळी पोलीस दिसताच तो तत्काळ पळुन गेला.यावेळी पोलीसांना ब्लॅक डिलक्स व्हिस्की-२२ क्वॉर्टर,मॅकडॉलच्या २७ क्वॉर्टर मिळुन आल्या. तसेच याच व्यक्तीच्या जुन्या घरात बॅगपायपरच्या-९,मॅकडॉल-५०,रॉयल स्टॅग-१३, अॉफिसर चॉइस-३९, इंपेरीयल ब्लु-७, संञा-२६, गावठी तयार दारु- ३५ कॅन मध्ये १५० असा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी शिरुर पोलीसांनी सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलीस  हवालदार प्रकाश कोकरे, संजय साळवे आदींनी भाग घेतला. या कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

शिरुर तालुक्यात इतर ठिकाणी दारुची विक्री होत असली तरी बहुतांश भागात दारुच्या कारवाया थंडावलेल्या दिसुन येत आहे. रांजगाव, शिक्रापुर पोलीसांनीही दारुच्या कारवाया कराव्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या