शिक्षकांनी माणूस घडविण्याचे काम करावे : डॉ. सप्तर्षी

Image may contain: 6 people, people on stage, people sitting, people standing and indoorशिरुर, ता.२४ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने शिक्षकांनी माणूस घडविण्याचे काम करावे असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कुमार सप्तर्षी बोलत होते.  याप्रसंगी शिरूर तालुक्यातील  गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांना तालुकास्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, उद्योजक प्रकाश धारीवाल, रविंद्र ढोबळे, शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे, घोडगंगा चे संचालक राजेंद्र गावडे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, मनीषा गावडे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, तालुकाध्यक्ष अशोक दरेकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे,  माजी सभापती  सुभाष उमाप, गणपतराव तावरे,कांतीलाल गवारे, सदाशिव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट शिक्षण संस्थाचालक म्हणून  माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, रविंद्र धनक, रंगनाथ हरगुडे, कांतीलाल शेलार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले गुणवंत पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे :- गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार : अर्जुन चव्हाण (अभिनव विद्यालय सरदवाडी), शहाजी भोस (हनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी), अशोक सरोदे (सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय कासारी). गुणवंत शिक्षक पुरस्कार : अशोक कर्डीले (तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वि), डॉ. अजित कोकरे (गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे), रामदास रोहिले (न्यू इंग्लिश स्कूल शिरुर), सरला ढमढेरे (आर.बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे), उषा गावडे (डॉ. आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभूळसर खुर्द), पांडुरंग पवार (माध्यमिक विद्यालय सणसवाडी), अंबादास गावडे (भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा), उर्मिला मांढरे (स्वातंत्र्यसेनानी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे-हिवरे), रोहिणी आवटी (विद्याधाम प्रशाला शिरूर), वर्षा सोनावळे (भैरवनाथ विद्यालय करडे), किशोर गोगावले (कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई), नवनाथ बगाटे (न्यू इंग्लिश स्कूल धामारी), मच्छिंद्र खेडकर (भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ), रोहिदास पोटे (पांडुरंग अण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद), रोहिदास मांजरे (बापुसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी). गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार : प्रकाश राऊत (श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी), संजय फलके (बी. एम.ताठे विद्यालय कारेगाव), सुरेश हांडे (श्री संतराज महाराज विद्यालय रांजणगाव सांडस). कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गवारे यांनी केले. शारदा मिसाळ ,धर्मेंद्र देशमुख,संदीप सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक दरेकर यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या