रांजणगाव पोलीसांकडून खंडणीखोर अटकेत

No automatic alt text available.रांजणगाव गणपती, ता. २४ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : रांजणगाव परिसरात बेकायदेशीररित्या वाहनचालकांकडुन खंडणी गोळा करणा-यांस रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी परिसरात एमआयडीसी मंडळाच्या मालकीच्या ओपन स्पेस मध्ये माल घेउन येणारे वाहने पार्क केली जात होते. पार्किंगच्या ठिकाणी वाहनचालकांकडून बेकायदा सेक्युरीटीचार्ज पावती जबरदस्ती घेउन खंडणी गोळा केली जात होती. याबाबत एमआयडीसीचे अधिकारी सतीश चौंडेकर यांनी फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश सुदाम अभंग (रा.ढोकसांगवी), प्रविण थिटे (मुळगाव वडझिरे) यांना अटक करुन बनावट पावत्या जप्त केल्या तर मुख्य सुञधार संतोष रघुनाथ श्रीराम याला शिरुर शहरात सापळा रचून अटक केली आहे.

रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस हवालदार तुषार पंदारे, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, मंगेश थिगळे, उद्धव भालेराव यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चमन शेख हे करत आहे.

दरम्यान रांजणगाव एमआयडीसी परिसरात माल घेउन येणारे-जाणारे वाहनचालकांबाबत असा प्रकार घडल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन रांजणगाव पोलीसांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या