रांजणगावातील सत्ताधाऱयांमुळे तरुण बेरोजगारः संदीप कुटे

Image may contain: 2 people, people standing and beard
रांजणगाव गणपती, ता. 24 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. परंतु, रांजणगावातील तरुण मात्र बेरोजगार आहेत. कारण सत्ताधार्यांनी स्वतःकडेच सगळ्या कामांचे ठेके घेतले आहेत. कंपनी व्यवस्थापणाशी सत्ताधार्यांचे लागेबांधे असल्याने इतरांना कामे मिळत नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे यांनी केला आहे.


www.shirurtaluka.com सोबत बोलताना कुटे म्हणाले, रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. स्थानिक तरुण येथे काम मागायला गेल्यास त्यांना नकार दिला जातो. इतर कोणत्याही प्रकारचा ठेका स्थानिक युवकांना मिळू नये हा प्रयत्न सत्ताधार्यांकडून केला जातो. एखादया कंपनीत कामगारांनी युनियन केली किंवा स्वतःच्या मागणीसाठी संप पुकारला तर हेच सत्ताधारी कंपनी व्यवस्थापनाशी तडजोड करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कामगारांचे नुकसान करतात. त्यामुळे पैशातून सत्ता आणि सत्तेतून सत्ता हे समीकरणच बनले आहे.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा आज (ता. २४) शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी व विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचारात रंगत आणली आहे. रांजणगावची सत्ता नक्की कोणाकडे जाणार? याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचं लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. २७) निकाल असून, रांजणगावला सत्तातंर होणार का? परत सत्ताधारीच गावकारभारी होणार याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या