शिरुर पोलीसांचा पञकार संघाकडून सत्कार

Image may contain: 4 people, people standing, night and outdoorशिरुर, ता.२५ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहर व हद्दीत निर्विघ्न पार पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल व बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा-यांचा शिरुर तालुका मराठी पञकार संघाकडुन सत्कार करण्यात आला.

शिरुर शहर व हद्दीत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व भावपुर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.यावेळी शिरुर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे गणशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यात आला.निवडणुक, मोहरम व गणोशोत्सव असा बंदोबस्त असुनही पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळेच गणरायाला जल्लोषात निरोप देण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी बोलताना सांगितले.तर यावेळी पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी शिरुरकर हे शब्दाला जागणारे असुन शिरुरकरांचा आदर्श वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले.

प्रारंभी शिरुर तालुका मराठी पञकार संघाचे शहराध्यक्ष प्रा.सतीश धुमाळ यांनी प्रास्ताविक केले.संजय बारवकर यांनी सुञसंचालन केले.तर शिरुर तालुका मराठी पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर यांनी आभार मानले.या वेळी शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, पञकार अभिजित आंबेकर,धर्मा मैड,पोलीस निरीक्षक भगवान मुंढे,पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे,पोलीस उपनिरीक्षक युसुफ इनामदार, शिरुर शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते,शिरुर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या