शिरूरचे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक पुरस्कार जाहीर

Image may contain: 8 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 27 सप्टेंबर 2018: शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार, संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव शितोळे व सचिव मारूती कदम यांनी बुधवारी (ता. 26) येथे जाहीर केले.

गुणवंत शिक्षक व कंसात त्यांच्या शाळेचे नाव पुढीलप्रमाणे:
डी. एन. खरमाटे (विद्याधाम प्रशाला, शिरूर), पांडुरंग दौंडकर (आर. एम. धारिवाल विद्यानिकेतन प्रशाला, कोंढापुरी), कैलास धुमाळ (भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ), गंगाधर तोडमल (जीवन विकास मंदिर, शिरूर), नामदेव आगरकर (कालिकामाता माध्यमिक विद्यालय, वाघाळे), राजाराम ढवळे (नागेश्‍वर विद्यालय, निमोणे), उर्मिला मांढरे (स्वातंत्र्यसैनिक शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा), अरूण सातपुते (दामोदर नामदेव ताठे विद्यालय, कारेगाव), सुरेखा डोईफोडे (समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय, तळेगाव ढमढेरे), शिवाजी घाडगे (न्यू इंग्लिश स्कूल, धामारी), दिलीप वाळके (श्री भैरवनाथ विद्यालय, आलेगाव पागा), सुरेखा शेळके (न्यू इंग्लिश स्कूल, अण्णापूर), गोविंद जेधे (संतराज महाराज विद्यालय, रांजणगाव सांडस), कैलास ढोकले (विद्याविकास मंदिर, करंदी), रामचंद्र हिंगे (श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रमशाळा, निमगाव म्हाळुंगी), मच्छिंद्र माने (विद्याधाम विद्यालय, कान्हूर मेसाई), सुभाष वेताळ (मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती), माणिक सातकर (स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर विद्यालय, तळेगाव ढमढेरे), भास्कर भालेराव (न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर), रखमाजी कापसे (जय मल्हार हायस्कूल, जांबूत), प्रशांतकुमार माने (सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर), मारूती दरेकर (फ्रेंडस सेकंडरी स्कूल, कोरेगाव भीमा), चारूशीला जाधव (आर. एम. धारिवाल इंग्लिश मिडीअम स्कूल, शिरूर), दादाभाऊ औटी (तात्यासाहेब सोनवणे विद्यालय, निर्वी), वासुदेव गुंड (छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रासाई), अविनाश थोरात (न्यू इंग्लिश स्कूल, कवठे येमाई), दिलीप शिंदे (भैरवनाथ विद्यालय, कर्डे), शंकर आडसूळ (महर्षि शिंदे हायस्कूल, आंबळे), नानाभाऊ थोरात (न्यू इंग्लिश स्कूल, भांबर्डे), रावसाहेब मुसळे (बापूसाहेब गावडे विद्यालय, म्हसे).

रविवारी (ता. 30) सकाळी साडेदहा वाजता येथील विद्याधाम प्रशालेच्या सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, उपशिक्षणाधिकारी दिलीप थोरे, पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.

Image may contain: 8 people, people smiling, people standing and wedding

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या