रांजणगावमध्ये दहा वर्षानंतर सत्ता परीवर्तन (Video)

Image may contain: 28 people, people smiling, people standing
रांजणगाव गणपती, ता. 27 सप्टेंबर 2018: रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले. श्री मंगलमूर्ती पॅनेलने 17 पैकी 16 जागा जिंकून सत्ताधारी महागणपती पॅनेलचा धुव्वा उडवून सरपंचासह ग्रांमपंचायतीत निर्विवाद स्पष्ट बहुमत मिळवून परिवर्तन केले आहे. सत्ता परिवर्तनामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, असे विजयी उमेदवारांनी सांगितले.

येथील ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीत श्री मंगलमूर्ती पॅनेलचे उमेदवार सर्जेराव बबन खेडकर यांनी महागणपती पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय आनंदराव पाचुंदकर यांचा पराभव करून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे.


सहा प्रभागात 17 जागांसाठी झालेल्या सदस्यांच्या निडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. 5586 मतदानापैकी 4892 इतके एकूण मतदान झाले. सरपंचपदासाठी सर्जेराव खेडकर यांना 2441 मते आणि दत्तात्रय पाचुंदकर यांना 2425 मते मिळाली.17 मतांनी श्री खेडकर विजयी झाले आहेत.

प्रभागानुसार प्रथम विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते :
प्रभाग एक : 2 जागा : हिराबाई पंढरीनाथ खेडकर (393, विजयी), निता नितीन खेडकर (345 पराभूत)/आनंदा तुकाराम खेडकर (425 विजयी), निलेश सुरेश खेडकर (318 पराभूत).

प्रभाग दोन :-3 जागा : विलास बाळासो अडसूळ (552 विजयी), हिराबाई नारायण शेलार (443 पराभूत)/अजय तुकाराम गलांडे ( 602 विजयी), मोहन आत्माराम शेळके (426 पराभूत) / निलम श्रीकांत पाचुंदकर (662 विजयी), लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर (361 पराभूत).

प्रभाग तीन : 3 जागा :- धनंजय विठ्ठल पवार (512 विजयी ), गणेश भगवंत लांडे (303 पराभूत)/ मिनाक्षी दिलीप लांडे (340 विजयी), सुजाता पंडीत लांडे (418 पराभूत)/ सरेखा प्रकाश लांडे (479 विजयी), शोभा रमेश शेळके (394 पराभूत).

प्रभाग चार : 3 जागा :- स्वाती भानुदास शेळके ( 274 विजयी), वैशाली प्रकाश शेळके (239 पराभूत)/ बाबासो धोंडिबा लांडे (258 विजयी), नवनाथ विलास लांडे (254 पराभूत). सुप्रीया योगेश लांडे (269 विजयी), शोभा सूर्यकांत लांडे (244 पराभूत).

प्रभाग क्रमांक पाच : 3 जागा : रंभा माणिक फंड (438 विजयी), रंजना महादू फंड (429 पराभूत)/ राहूल अनिल पवार ( 472 विजयी), अनिल बाळासो दुंडे (402 पराभूत)/अनिता सुदाम कुटे (490 विजयी), शुभांगी योगेश पाचुंदकर (376 पराभूत).

प्रभाग क्रमांक साहा : 3 जागा : संपत गणपत खेडकर (512 विजयी), रामदास परशुराम खेडकर (377 पराभूत)/आकाश संजय बत्ते (551 विजयी), बबन आनंदराव बत्ते (333 पराभूत)/ अर्चना संदिप पाचुंदकर (449 विजयी), अलका संभाजी गदादे (440 पराभूत).

Image may contain: one or more people, crowd and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या