ग्रामपंचायत निवडणुक निकाल इतके का धक्कादायक ?

No automatic alt text available.शिरुर, ता. २९ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकित अनपेक्षित निकाल लागले तर अनेक ठिकाणी मतदाराजाने संमिश्र कौल दिला.शेवटी मतदारराजा हा राजाच असतो.

शिरुर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम पार पडला.यानिवडणुकित धानोरे ग्रामपंचायत पुर्णपणे बिनविरोध झाली. रांजणगाव गणपती, करडे, चव्हाणवाडी, ढोकसांगवी, कळवंतवाडी, आंबळे या ग्रामपंचायती तशा पुर्वीपासुन संवेदनशील मानल्या जातात. शिरुर तालुक्यात झालेले मोठ्या प्रमाणावर औद्योगिकिरण, त्यामुळे आलेली सुबत्ता या अशा विविध कारणांमुळे यातील रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, करडे या ग्रामपंचायतींकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन होते.रांजणगाव गणपती ग्रामपंचायत मध्ये सुमारे दहा वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झाले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकित सर्जेराव खेडकर यांनी दणदणीत विजय मिळवत दत्ताञय पाचुंदकर यांना पराभवाचा जोरदार झटका दिला. करडे ग्रामपंचायत निवडणुकित सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड यांना धक्का बसला.करडेत सरपंचपदी सुनिल इसवे विजयी झाले.तर चव्हाणवाडी ग्रामपंचायतीत माजी पंचायत समितीच्या उपसभापती मंगल लंघे यांचे पती संतोष लंघे यांना सरपंचपदाची संधी मिळाली. आंबळे ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदासाठी महेश बेंद्रे यांनी कंबर कसली होती. परंतु त्यात अपयश आले अन सोमनाथ बेंद्रे आंबळे या गावात सरपंचपदावर विराजमान झाले. कळवंतवाडी गावात दादासाहेब चव्हाण सरपंचपदावर निवडुन आले. ढोकसांगवीत सरपंच म्हणुन मतदारांनी शोभा शेलार यांना पसंती दिली.

या निवडणुकित दोन्ही गटांकडुन दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. अनेक वाद-विवादांमुळे यातील काही ग्रामपंचायती मतदानापुर्वी गाजल्या होत्या. त्याचप्रमाणे मातब्बर नेत्यांच्या ग्रामपंचापती म्हणुन ओळख असलेल्या ग्रामपंचायतीत मतदार कोणाला साथ देणार याची उत्कंठा तालुक्याला लागली होती. मताला चांगला भाव फुटल्याने या ग्रामपंचायतींत दिवाळीपुर्वीच मतदारांची दिवाळी झाली असल्याची चर्चा आता तालुक्यात होत असुन मतदार राजाने मतदार राजा हा राजाच असतो हे पुन्हा दाखवुन दिले आहे. पैसा हा विजयासाठी पुरेसा नसतो हेही यानिमित्ताने दाखवुन दिले आहे. शिरुर-हवेली,शिरुर-आंबेगावातील बड्या नेत्यांना ही निवडणुक नक्कीच विचार करायला लावणारी आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या