चारीमुंडया चित करत दाखवला घरचा रस्ता: संदीप कुटे

Image may contain: one or more people, people sitting and people standing
रांजणगाव गणपती, ता. 29 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): रांजणगाव गणपती ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधार्यांनी मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करुन मतदान करण्यास भाग पाडले. परंतु, मतदारांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त करत सत्ताधार्यांना चारीमुंडया चित करत घरचा रस्ता दाखवला, असे मत उद्योजक संदिप कुटे यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केले.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतमध्ये गेली १० वर्षे शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांची सत्ता होती. गावात अनेक कोटींची विकासकामे केल्याचे सत्ताधारी सांगत होते. परंतु, विरोधकांनी गावचा कचराप्रश्न व सांडपाणी या महत्वाच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना लक्ष करत त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. सत्ताधारी व विरोधक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत निवडणुकीत पहिल्या दिवसापासूनच रंगत आणली होती. त्यामुळे शिरुर तालुक्याच नव्हे तर पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीवर होते.

गेली १० वर्ष सत्ताधाऱ्यांच्या दहशतीला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मातपेटीद्वारे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याने विरोधकांना १० वर्षानंतर मोठे यश मिळाले. त्यामुळे "गाव करील ते राव करील काय"या म्हणीचा प्रत्यय सत्ताधाऱ्यांना आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या