मुलींना समानतेची वागणूक द्या: सुवर्णा शिंदे

शिरुर, ता. १ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : समाजात आज प्रत्येक क्षेञात मुलींनी नाव मोठे केले असुन आई-वडीलांनी मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता आपल्या मुलींवर विश्वास दाखवला तर ती सुद्धा गरुडझेप घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन कारागृह पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी व्यक्त केले.

शिरुर शहरातील मनस्विनी महिला उन्नती संस्थेच्या वतीने वृक्षारोपन व शाखा उद्घाटन व पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पोलीस निरीक्षक कैलास घोडके,पोलीस मिञ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाळेकर, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,मुख्याधिकारी अॅलिस पोरे,पॉलिटिकल  एडिटर  नेहा पुरव, यशस्विनीच्या दिपाली शेळके, उद्योजिका सुनिता जगताप, नगरसेविका रोहिणी बनकर, सुनिता कुरंदळे, ज्योती लोखंडे, रेश्मा लोखंडे, पुजा जाधव, उज्ज्वला बरमेचा, मनिषा कालेवार, संगिता मल्लाव, सुरेखा शितोळे, उज्ज्वला वारे, मनस्विनीच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनस्विनीच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड म्हणाल्या कि, वृक्षारोपन ही काळाची गरज असुन मागील काही वर्षांपासुन वृक्षतोड झाल्याने वृक्षलागवड करणे हि काळाची गरज बनली आहे. या प्रसंगी आदर्श माता म्हणुन भामिनी शिंदे, उत्कृष्ट मैदानी मर्दानी म्हणुन तलवार बाजीत प्राविण्य मिळविलेल्या सुष्मिता  ढमढेरे, लघु उदयोजिका  अनिता पावसे व नंदा कुरुंदळे तर उत्कृष्ट व्यावसायिका मनिका बांगर यांना पुरस्कार देउन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिञा विजय गायकवाड, कोमल लोखंडे, पुष्पा जाधव, आशा घाडगे, संगिता तावरे, शकुंतला लोखंडे, ललिता कुरंदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या