शिरूर तालुक्यात ४ हजार ३४० विद्यार्थी चित्रकला परीक्षेत

Image may contain: one or more people and people sitting
शिरुर, ता.१ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : कला संचालनालय मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणारी एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षा शिरूर तालुक्यातील आठ केंद्रावर ४ हजार ३४० विद्यार्थ्यांनी दिली असल्याचे शिरूर तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप यांनी सांगितले.               

कला संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत  दि.२७ ते ३० सप्टेंबर दरम्यान एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी शिरूर तालुक्यातून आठ केंद्रामधून एलिमेंटरी साठी २६९० तर इंटरमिजिएट साठी १६५० असे एकूण ४३४० परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. केंद्रनिहाय अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ची परीक्षार्थींची संख्या  पुढीलप्रमाणे :- स्वा.सै.रायकुमार बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (५१८ व २०४), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (१८४ व १६७), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (५५० व ३३२),श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (३३४ व २५९), भैरवनाथ विद्यालय पाबळ (३२७ व २२५), पोदार इंटरनॅशनल स्कूल शिरुर (२३६ व १५९), विद्याधाम प्रशाला शिरूर (३१५ व १९२), जय मल्हार हायस्कुल जांबुत (२२६ व ११२). एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीनुसार इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत गुण वाढवून मिळत असल्याने दिवसेंदिवस या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे यावेळी बोलताना प्रविण जगताप यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या