शिरुरकरांनी जमा केला केरळग्रस्तांसाठी मदतनिधी

Image may contain: 11 people, people smiling, people sitting and indoorशिरुर, ता.९ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : केरळवासीयांसाठी आपलेही योगदान असावे या सामाजिक भावनेतून शिरुर शहरातुन पाच महिला संघटनांनी एकत्र येऊन सव्वा लाख रुपयांची मदत जमा केली आहे.

शिरुर शहरातील आदिशक्ती महिला मंडळ, अॅक्टिव्ह सोशल ग्रुप, रामलिंग महिला उन्नती संस्था, वारसा जिजाऊ फाउंडेशन  या महिला मंडळासह युवा स्पंदनच्या युवक युवतींनी एकत्र येऊन केरळवासीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मदतनिधीसाठी या संघटनांनी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या संघटनांच्या सदस्यांनी मदतनिधीसाठी मेहनत घेत असतानाच स्वत : देखिल खारीचा वाटा उचलला. मदतनिधी शोच्या माध्यमातून सुमारे जमा एक लाख पंधरा हजार सहाशे चाळीस रुपये इतकी जमा झाली होती.या रकमेचा धनादेश 'मुख्यमंत्री केरळ पुरग्रस्त सहायता निधी ' या नांवाने तहसिलदार रणजित भोसले यांच्याकडे नुकताच सुपुर्त करण्यात आला.

आदिशक्ति मंडळाच्या संस्थापिका शशीकला काळे , अॅक्टीव्ह ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा, रामलिंग संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,वारसा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्री थोरात, शिल्पा बढे ,युवा स्पंदनच्या प्रमुख प्रियांका धोत्रे, लता नाझीरकर, सुवर्णा सोनवणे,रूपाली बोरा, अलका ढाकणे, राणी शिंदे, ललिता पोळ आदी यावेळी उपस्थित होते.

देशबांधवांसाठी आपुलकीची भावना जपल्याचे मनस्वी समाधान लाभल्याची प्रतिक्रिया यावेळी या महिलांनी व्यक्त केली. जिथे शक्य आहे तिथे मदतीचा हात देत राहणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या संघटना सातत्याने सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रम राबवत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या