शिरुरला घोडनदीपाञात बुडून एकाचा मृत्यू

No automatic alt text available.
शिरुर,ता.१० अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथील घोडनदी पाञात एकाचा मृतदेह आढळुन आल्याची घटना(दि.९) रोजी घडली.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला आदाम हुसैन शाहा(रा.लाटेआळी) यांनी फिर्याद दिली आहे तर रज्जाक अहमद इनामदार (वय.४५, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.९) रोजी शिरुर येथील विसर्जन घाटाजवळ घोडनदी पाञात पुरुष जातीच्या व्यक्तीचे प्रेत पाण्यात उलट्या स्थितीत तरंगत्या स्थितीत आढळुन आले. यावेळी फिर्यादी यांनी गर्दी झाल्याने पाहण्यासाठी गेले होते.त्यावेळी फिर्यादी यांनी काही लोकांच्या मदतीने ते प्रेत पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी सदर व्यक्ती ओळखीची वाटल्याने पुन्हा पाहिले असता,सदर व्यक्ती फिर्यादी यांचे चुलत मामा रज्जाक इनामदार असल्याचे ओळखले.

मयत रज्जाक इनामदार हे फिर्यादी यांच्याकडे (दि.५) रोजी फिरत आले होते. व ते (दि.८) रोजी दुपारी एक च्या सुमारास फिर्यादी यांच्या आईला एस.टी स्टॅंड वर अंघोळ करतो व नगर ला जावुन येतो असे सांगुन निघुन गेले होते असे दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक अभिषेक  ओव्हळ हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या