वाघेश्वर मोटर्सचा आज उद्घाटन सोहळा (Video)

Image may contain: 11 people, people smilingमांडवगण फराटा, ता. 11 अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता. शिरुर) वाघेश्वर मोटर्स या हिरोच्या शोरुमचा उद्घाटन सोहळा माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती वाघेश्वर मोटर्सचे संचालक सुधीर फराटे यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील नागरिकांसाठी मांडवगण फराटा येथेच अत्याधुनिक शोरुम सुरु केले असुन या निमित्ताने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या असल्याने वाहन खरेदी व दुरुस्तीसाठी नागरिकांना दुर जावे लागणार नाही.

हा उद्घाटन सोहळा माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते हे असणार आहेत. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिरुरचे माजी आमदार अशोक पवार, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, जनता बॅंकेच चिफ मॅनेचर संदिप जाधव, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, घोडगंगेचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, कलस्वामी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकर पिंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुधीर फराटे यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या