शिरूर तालुक्यातील रस्त्यांना 'अच्छे दिन' कधी येणार?

Image may contain: plant, tree, sky, outdoor and nature
निमोणे, ता. 12 ऑक्टोबर 2018 (तेजस फडके): निमोणे-करडे तसेच करडे-न्हावरे रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर जड वाहतूक मोठया प्रमाणात चालत असून, या खड्डयांमुळे वाहनचालकाना कसरत करावी लागत आहे. शिरूर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट आहे, त्यामुळे रस्त्याला "अच्छे दिन" कधी येणार असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

निमोणे-करडे या रस्त्याची गेल्या वर्षभरापासुन दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे असून, साईटपट्ट्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहने समोरासमोर आल्यावर एकमेकांना साईट देता येत नसल्याने अनेकवेळा भांडणे होतात त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवणे कठीन होऊन बसले आहेत. दुचाकी वाहन चालवताना अनेक वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात अशी मागणी करडे ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.

Image may contain: shoes and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या