सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Image may contain: 1 personशिरुर, ता.१३ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : वडनेर खुर्द (ता.शिरुर) येथे विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा आनंदा पवार (वय. २१, रा.वडनेर खुर्द. ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असुन या प्रकरणी शिवाजी भगवान साळुंके (रा.तेजेवाडी,ता.जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेखा हिचे (दि.१.५.२०१२) रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात वडनेर खुर्द येथील आनंद बाजीराव पवार याचेशी लग्न झाले होते. यानंतर काही काळ सर्व सुरळीत असताना सासरच्या व्यक्तींकडुन मानसिक व शारिरिक छळ सुरु केला जायचा. फिर्यादी यांनी वारंवार सासरच्या मंडळींना वारंवार समजुन सांगितले होते. दरम्यान (दि.५) रोजी सुरेखाने सासरच्या व्यक्तींकडुन छळ होत असल्याचे सांगितले.(दि.८) रोजी फिर्यादी यांच्या शेजारी राहणा-या मुलीने घरी येउन फिर्यादी यांची मुलगी लक्ष्मी हिस सुरेखाने फोनवर नव-याने मारहाण केली असुन सततच्या जाचाला कंटाळुन औषध पिणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचा मुलगा सुरेखा ला भेटायला वडनेर या ठिकाणी गेला असता (दि.९) रोजी सुरेखाने सासरच्या छळाला कंटाळुन औषध पिल्याचे सांगितले. दरम्यान(दि.९) रोजी राञी सुरेखावर खासगी दवाखान्यात उपचार चालु असताना औषध पिल्याने मृत्यु झाला.

माहेरहुन पैसे आणावेत तसेच चारिञ्यावर संशय घेउन वेळोवेळी मारहाण केल्यानेच सुरेखाने सारच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी सुरेखाचा पती आनंदा पवार,सासरे बाजीराव पवार,सासु रंजना पवार,दिर कुंदन पवार यांच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या