पुणे जिल्हयातील गुंडांवर कडक कारवाई करणार (Video)

Image may contain: 11 people, people standing, crowd, wedding and outdoorशिरुर, ता.१३ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील वाळुमाफिया, खासगी बेकायदेशीर सावकारी, अवैध हातभट्टी विक्री करणारे यांच्यावर एमपीडीए तसेच मोक्का कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

शिरुर पोलीस स्टेशनला वार्षिक परिक्षणानिमित्त आले असता शिरुर पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस पाटील व सामाजिक संघटना, राजकिय प्रतिनीधी व नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी प्रथम पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न जाणुन घेतले. यावेळी रविंद्र सानप यांनी पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या वाढवा अशी मागणी केली. शिरसगाव काटा येथील मानसिंग कदम यांनी शिरसगाव काटा येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास अद्याप लागलेला नाही याबाबत तातडीने तपास लावण्याची मागणी केली.प्रा.सतीश धुमाळ यांनी शहरातील वाहतुक कोंडी संदर्भात सुचना मांडली.

Image may contain: 2 people, people sitting and outdoorरणजित पाडळे यांनी मांडवगण परिसरातील पुर्व भागातील वाळुमाफियांबाबत लक्ष वेधले.बाबसाहेब शेलार यांनी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील अवैध हातभट्टी विक्री करणा-यांवर कडक कारवाई तसेच पोलीस पाटलांना रायफल ऐवजी रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली.तर जयवंत साळुंके यांनी महाविद्यालय व शाळा सुटण्यावेळी सदरील रस्त्यांवर पोलीस गस्त वाढवावी.पुजा पंदरकर हिने कॉलेज व शाळा सुटण्यावेळेस दामिनी पथकाची मागणी केली.भरत काळे यांनी बेकायदेशीर सावकारकीचा मुद्दा उपस्थित केला.तसेच अॅड.अमृता खेडकर,बाबुराव पाचंगे,जिजाताई दुर्गे, नामदेव घावटे,ललिता कुरंदळे यांनी विविध सुचना मांडल्या.नागरिकांच्या समस्या पोलीस अधिक्षक पाटील यांनी जाणुन घेतल्या.

नंतर बोलताना सांगितले कि,सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे खासगी बेकायदेशीर सावकारी विरोधात तक्रारी देण्यासाठी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे.अशा सावकारांकडुन पैसे वसुलीसाठी गुंडांचा वापर करुन सर्वसामान्यांना ञास दिला जातो,त्यांची घरे बळकावली जातात.त्यामुळे बेकायदेशीर सावकारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कडक कारवाई करणार आहे.सातारा जिल्ह्यात १२ सावकारांना मोक्का लावला होता.बारामती उपविभागाअंतर्गत दोन खासगी सावकारांवर या कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे.सर्व सामान्य नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी दिल्यास कठोर कारवाई करु असे सांगितले.बेकायदेशीर वाळुमाफियांसाठी विशेष पोलीस पथक नेमुण वाळुमाफियांवर कारवाई करण्यासाठी एमपीडीए व मोक्कांतर्गत कारवाई करु तसेच त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला.शिरुर व दौंड याभागात वाळुमाफिया व सावकारी संदर्भात कडक कारवाई करु.समाजाला सुरक्षा व चांगले वळण लावणे हे प्रशासनाचे काम आहे.यापुढे अवैध हातभट्टी विक्री करणा-यांवरही एमपीडीए  कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी पोलीसांना दिल्या.

शिरसगाव काटा येथील दुहेरी हत्याकांडाबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि या हत्याकांडाचा तपास क्राईम ब्रॅंच कडे तपास देण्यात येणार असल्याचे जाहिर केले.तसेच दोन विनयभंगाचे गुन्हे असलेल्यांवर तडीपारी कारवाई करणार असल्याचे सांगितले.शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत नुकतेच काही मनुष्यबळ दिले आहे तरीही जास्त कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलीस पाटलांना रायफल पाहिजे तर रायफल देउ व रिव्हॉल्व्हर पाहिजे तर रिव्हॉलव्हर देउ परंतु त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे असे पोलीस पाटलांना सांगितले.ग्रामसुरक्षा दल पुन्हा कार्यरत केले असुन त्यामध्ये सर्व घटक सामील केले आहे.शिरुर शहरासाठी वॉर्ड सुरक्षा दल बनवा अशी सुचना पाटील यांनी केली.पुणे जिल्हयातील गुंडांवर एमपीडीए, मोक्का, तडीपारी अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी ठासुन सांगितले.या बैठकिा शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांच्यासह हद्दीतील महिला दक्षता समिती, विविध सामाजिक संघटना, राजकिय पदाधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. बैठकिला प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक भगवान मुंढे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या