शिरूरमधील गद्दारांना दरवाजे कायमचे बंदः अजित पवार

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 15 ऑक्टोबर 2018: राष्ट्रवादी पक्षाशी उमेदवारीवरून कोणीही गद्दारी अथवा गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास सबंधितास माझ्या घराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. शिरूर लोकसभा व विधानसभा निवडणूकीतही गद्दार अथवा गडबड करणाऱयांना अजित पवार स्टाईलने कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे एखा कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, 'शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीसाठी माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या दोघांनीही कंबर कसली असली तरी राष्ट्रवादीची उमेदवारी दोघांपैकी एकालाच मिळणार आहे. उमेदवारीबद्दलचा निर्णय खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.'

विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीमुळे शिरूरचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. पक्षाच्या उमेदवारीसाठी अशोक पवार व प्रदीप कंद दोघेही तेवढेच इच्छुक असल्याने एकाने लोकसभा तर एकाने विधानसभा लढवावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, दोघेही आमदारकीसाठी ठाम आहेत. त्यामुळे पक्षाला याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही पवार म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या