शिरूरमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून दिवसाढवळ्या रोकड लंपास

शिरूर, ता. १६ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनिधी): शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ बारणे यांच्या दुकानासमोर  मोटार सायकलच्या डिकीमध्ये ठेवलेली एक लाख  80 हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या भरगर्दीत घडल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूदेश विष्णू म्हस्के (रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश म्हस्के यांचा रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये  कामगार पुरवण्यांचा  व्यवसाय आहे. कामगारांच्या पगारासाठी त्यांनी कार्पोरेशन बँकेमधून  एक लाख ८० हजाराची रक्कम काढली होती. ते  इंदिरागांधी पुतळ्यासमोर आले असता, मोटरसायकल  पुतळ्यासमोर पार्क करून, ते चहा पिण्यासाठी गेले. दरम्यान अज्ञात इसमाने आक्टिवा दुचाकी (क्रमांक एम.एच १२ पी. एम ९९५१)च्या डिक्किचे लॉक तोडून त्यातील पैसे चोरून नेले. फिर्यादी पुन्हा चहा पिवून आल्यानंतर ही चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनला धाव घेऊन  अज्ञात चोरटयाविरुद्ध फिर्याद दिली.

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक संजय जाधव हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या