'त्या' हातांचा पञकारांच्या हस्ते विशेष सन्मान

Image may contain: 11 people, people smiling, outdoorशिरुर, ता.१६ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनिधी): कुडकुडणारी थंडी असो कि,धो-धो कोसळणारा पाउस असो सर्व ऋतुत प्रतिकुल परिस्थितीत समाजासाठी काम करणा-या 'त्या'हातांचा पञकारांच्या हस्ते  विशेष सन्मान करण्यात आला.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिननिमित्त  शहरातील वृत्तपत्रविक्रेत्यांचा सन्मान शिरुर शहर मराठी पत्रकार संघाचा वतीने करण्यात आला.यावेळी पोलिस निरीक्षक कैलास घोडके व तहसिलदार रणजित भोसले यांच्या हस्ते वृत्तपञ विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे नितिन बारवकर, अभिजित आंबेकर, मुकुंद ढोबळे, धर्मा मैड, बोरा महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठचे केंद्र संयोजक प्रा.चंद्रकांत धापटे, शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, शोभना पाचंगे आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मुथा, बाबा कुलकर्णी, प्रदिप चोपडा, शरद क्षीरसागर, कैलास राऊत, बबन चौरे, गंगाराम जाधव, राजू तुबाकी, योगेश गोपाळ, प्रशांत फुलफगर, पंकज निकाळजे आदींचा पुस्तके, गुलाबपुष्प, श्रीफळ व पेन देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलिस निरीक्षक कैलास घोडके  म्हणाले की, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे विज्ञानप्रेमी व पुस्तकांशी मैत्री करणारे होते. वृत्तपत्र विक्रेते हे अत्यंत प्रामाणिकपणे उन पाऊस थंडी यांचा विचार न करता नियमितपणे घरोघरी वृत्तपत्र पोहचवितात त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. तहसिलदार रणजित भोसले म्हणाले सामाजिक बांधिलकीचा माध्यमातून पत्रकार संघ नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. वृत्तपत्रविक्रेताविषयी कृतज्ञता म्हणून सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सतीश धुमाळ यांनी केले. ते म्हणाले की, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम नेहमी सांगत की युवक ही देशाची ताकद असून या युवाशक्तीचा आधारे देशात बदल घडू शकतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत ते यशाचा शिखरावर पोहचले.ते समाजाचे लोकशिक्षक होते देशाच्या विज्ञान, संशोधन, सरंक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वृत्तपत्रविक्रेत्यांविषयी कृतज्ञतेपोटी त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे धुमाळ म्हणाले. यावेळी उपस्थिताचे स्वागत नितीन बारवकर, अभिजित आंबेकर यांनी केले. आभार मुकुंद ढोबळे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या