शिक्रापूरला आरोग्य शिबिरात १२५ जणांची तपासणी

Image may contain: one or more people and people sittingशिक्रापूर,ता.१६ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनिधी): शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात १२५ जणांची तपासणी करण्यात आली.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे स्पंदन वैद्यकीय संस्था, शिक्रापूर रोटरी क्लब व शिक्रापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन, ईसीजी तसेच दम्याच्या रुग्णांच्या तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले.

या उपक्रमासाठी सिप्ला व मॅनकाइंड या औषध कंपन्यांचे तसेच साई पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी चे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी शिक्रापूर चे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राम पोटे, माजी अध्यक्ष  डॉ. मच्छिंद्र गायकवाड, स्पंदन मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापुसाहेब इंगळे, डॉ. जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात स्पंदन व रोटरी क्लबच्या वतीने शिक्रापूर चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, माजी अध्यक्ष चौरसिया, सचिन खेडकर, श्रीकांत ढमढेरे, डॉ.हारदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल सासवडे, बळीराम कड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी केले तर श्रीकांत ढमढेरे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या