रांजणगावमध्ये ज्येष्ठ महिलेस लुबाडणा-यास अटक

Image may contain: one or more peopleरांजणगाव गणपती, ता.१७ ऑक्टोबर २०१८(प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिक महिलेस मारहाण करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन लुबाडणूक करणाऱ्यास रांजणगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील पार्वती सुभाष शेटे या महिलेस एकट्या घरी असताना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ९१हजार २००रुपयांचा ऐवज लुबाडून नेला होता. या बाबत रांजणगाव पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली होती.या गुन्ह्याची नोंद होताच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शना खाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्यासह पोलीस नाईक विनायक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद देवरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नलगे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे यांच्या पथकाने तपासाची सुत्रे हलवून आरोपी अखिल पापाभाई शेख यास अटक केली. तसेच चोरी गेलेला माल हस्तगत केला.

रांजणगाव पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली असून ३७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर खंडणी मागणाऱ्यास अटक केली आहे. नागरिकांकडून या कारवायाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या