अजित पवार, बांदल व अशोक पवारांचा एकत्र प्रवास!


Image may contain: 3 people, people smiling
शिरूर, ता. 20 ऑक्टोबर 2018: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार अशोक पवार व माजी सभापती मंगलदास बांदल यांनी एकाच मोटारीतून प्रवास केल्यामुळे शिरूर तालुक्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. प्रवासादरम्यान काय चर्चा झाली असेल, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

मांडवगण व विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा बॅंकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांनी नुकताच शिरूर तालुक्याचा दौरा केला. यावेळी शिरुर तालुक्यात प्रचंड राजकीय वितुष्ट असलेले माजी आमदार अशोक पवार व माजी सभापती मंगलदास बांदल एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते. कार्यक्रम संपल्यानतर अजित पवार बसले तर पवार व बांदल मागच्या सीटवर बसले अन् अर्धा तासाचा राजकीय प्रवास सुरू झाला.

शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून इच्छुक अशोक पवार व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मंगलदास बांदल इच्छुक आहेत. राष्ट्रवादीने बांदल यांना पक्षातून काढून टाकलेले आहे. दुसरीकडे ते मनसेकडेही गळ टाकून बसलेले आहेत. शिवाय, मंगलदास बांदल व अशोक पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र, अजित पवार यांनी दोघांना एकाच मोटारीत बसून अर्धा तास प्रवास केल्यामुळे अनेकांचे डोळे वटारले आहेत. हा अर्धा तासांचा राजकीय प्रवास शिरुर-हवेलीसाठी कसा ठरणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

या प्रवासाच्या निमित्ताने अशोक पवार व मंगलदास बांदल यांच्यातील मनोमिलनाची सुरवातही झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या