चॅटिंगवरून प्रेम करणाऱयावर विनयभंगाचा गुन्हा

Image may contain: one or more people and textशिक्रापूर, ता. 21 ऑक्टोबर 2018: सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून प्रेमाच्या गुजगोष्टी करणाऱयावर महिलेच्या तक्रारीवरून शिक्रापूर येथील पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.

चॅटींगसाठी व्हॉट्सऍपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या ऍपमुळे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत, असाच काहीसा प्रकार शिरूर तालुक्यात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील एका अविवाहीत महिलेचे दोन वर्षापूर्वी हरियानामध्ये सनी यादव या योग शिक्षकसोबत मोबाईलवरून चॅटिंग सुरू झाले. हळूहळू ओळख वाढत गेली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे प्रेमाच्या गुजगोष्टी झाल्या. गेल्या दोन वर्षांत दोघे एकमेकांना कधीच भेटलेही नाहीत. परंतु, त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे मात्र, योग शिक्षकाने आपले 'योग' दुसरीकडेच जुळले असल्याचे महिलेला सांगितले. यामुळे महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या. महिलेच्या तक्रारीवरून मोबाईल चॅटिंग करणाऱया योगशिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पकडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांचे एक पथकही रवाना झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या