आदिशक्ती कडून शिरुरला महिलांचा सन्मान

Image may contain: 24 people, people smilingशिरूर, ता.२१ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : येथील आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने नवराञोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

आदिशक्तीच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवात नऊ दिवस माहिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.फॅन्सी ड्रेस स्पर्धेपासून ते होम मिनीस्टर पर्यंत रंगलेल्या विविध स्पर्धांत महिलांनी बक्षिसांची लयलूट केली. ब्युटी विथ ब्रेन या संकल्पनेतून रंगलेली 'मिसेस शिरूर' स्पर्धा सर्वांचे आकर्षण ठरली यात माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी कौशल्य दाखवताना हा किताब पटकाविला.तसेच विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे, दक्षता समितीच्या अध्यक्षा शोभना पाचंगे, संध्या शेळके , साधना शेठीया, डॉ हार्दे, प्राची दुधाने, परवीन शेख, लता गायकवाड, कृष्णाबाई जाधव या नवदुर्गांचा विशेष सन्मान करण्यात आला

महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात अभिनेता सुभाष यादव याने रंगत आणली.आपल्या खास विनोदी शैलीत त्याने धमाल उडवली. सुषमा सालके या पैठणीच्या मानकरी ठरल्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धत मोठ्या गटात नीता गायकवाड तर छोटया गटात आर्या तरडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात गौरी चिंचोलकर छोट्या गटात आर्या उपाध्याय यांनी तर समुह नृत्यात अलका ढाकने ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. पाककला स्पर्धेत (बिना उपवासाचे पदार्थ) आश्विनी लोहार तर उपवासाच्या पदार्थात तृप्ती मांढरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दांडीया स्पर्धेत मयुरी चोरडिया, नसरीन शेख व निर्मला ढोकले यांनी तर नववारी स्पेशल स्पर्धत अपर्णा घावटे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

आदिशक्तीच्या संस्थापिका शशिकला काळे व त्यांच्या सहकाऱ्यांसह नगरसेवक विनोद भालेराव, नगरसेविका उज्वला बरमेचा, रोहिणी बनकर, माजी नगराध्यक्षा सुनिता कालेवार, कविता वाटमारे, शाहिन पठाण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. रमामणी अय्यंगार, अश्विनी घारू, वैशाली जोशी, मेघा तारे, सोनल हिलाळ, सीमा काशीकर, पायल वर्मा, नीता सतिजा, शर्मा , संपदा राठोड व रोहिणी मास्तोळी यांनी स्पर्धाचे परिक्षण केले. आदिशक्तीच्या संस्थापिका शशीकला काळे, अध्यक्षा सुनंदा लंघे, सचिव नगरसेविका मनिषा कालेवार, जि.प. सदस्या कोमल वाखारे, सुवर्णा सोनवणे, उषा वाखारे, लता नाझीरकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या