वाडेगव्हाणजवळ बस व ट्रकमध्ये अपघात; ५ ठार (Live)

Image may contain: outdoor
शिरूर, ता. 22 ऑक्टोबर 2018: पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वाडेगव्हाणजवळ खासगी बस व ट्रकमध्ये आज (सोमवार) झालेल्या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला पहाटे सहाच्या सुमारास जोरात धडक दिली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर ११ जन जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शिरुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघातामध्ये जखमींची संख्या व नावे अद्याप समजू शकलेली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या