शिरुरला नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु

शिरुर, ता. २३ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) :  शिरुर नगरपरिषदेच्या सत्ताधारी व प्रशासन यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवार (दि.२२) पासून शिरुर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शिरूर नगरपरिषद  नगरसेवक मंगेश खांडरे,मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद आज सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ११ वाजता हे आमरण उपोषणास बसले आहेत.शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे (दि.२३) रोजी उपोषणास बसणार आहेत.

सोमवार (दि.२२) रोजी उपोषणाच्या पहिल्या दिवशी या उपोषण कर्त्यांची माजी नगराध्यक्ष नसीमखान,राजेंद्र क्षीरसागर,माजी नगरसेवक शशिकांत माने, माधवसेनेचे रवींद्र सानप, बाबुराव पाचंगे, मुस्लिम जमातीचे शहराध्यक्ष इकबालभाई सौदागर, महंमद हुसेन पटेल, संभाजी ब्रिगेडचे संजय बांडे, युवा सेनेचे सुनील जाधव, मनसेचे तारूआक्का पठारे, सविता बांडे, अदित्य मैड, भाजपा अल्पसंख्यांक चे राजू शेख, भाजपाचे विजय नरके  यासह कार्यकर्त्यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांची माहिती घेतली. नवीन प्रशासकिय इमारतीच्या वाढीव बिलास रु.७० लाख ते १ कोटींपर्यंतच्या चुकीच्या पद्धतीने मान्यता देण्यात आली आहे.भाजीबाजार येथील मटन मार्केटमधील गाळे अनधिकृतपणे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. जिजामाता गार्डन शेजारील जिमची वास्तु आजही धुळ खात पडुन आहे.नगरपरिषदेतील कंञाटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला पाहिजे.नगरपरिषदेतील विविध कामांचे ठेके घेणा-या कंञाटदारांनी एम्लॉय प्रॉव्हिडंट फंड आजतागायत भरलेला नाही.मारुती आळी येथे उभारण्यात आलेल्या मुख्याधिकारी निवास या ठिकाणी अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहेत. शहरातील ओढे-नाले यावर झालेले अतिक्रमण, हुडकोवासियांच्या घरे तत्काळ नावावर करणेबाबत, शहरातील सीटी सर्व्हे नं२०० च्या सरकारी जागेबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई,मंगलमुर्ती नगर येथील रस्ता नागरिकांसाठी डांबरीकरण करुन खुला करणे,अल्पसंख्यांक निधीचा वापर न करता शासनास परत पाठविणा-या व उर्दु शाळा बांधण्यास टाळाटाळ करणा-यांवर कारवाई करणे,शहरातील विविध अनधिकृत बांधकामांची चौकशी करुन कारवाई करणे आदी विषयांशी संबंधित खात्यांचे विशेष लेखापरिक्षण करुन कारवाई करण्यात यावे या मागण्यांसाठी तसेच सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आमरण उपोषण करत असल्याची माहिती मंगेश खांडरे, अनिल बांडे व महिबुब सय्यद यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या